Join us

अमृता सिंगसोबत झालेल्या घटस्फोटाबद्दल सैफ अली खानने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 19:00 IST

सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृता सिंगसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं.

बॉलिवूडचा नवाब उर्फ सैफ अली खान बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. नुकताच तो तान्हाजी चित्रपटात झळकला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं सगळीकडून खूप कौतूक झालं. सैफच्या जीवनात बरेच चढउतार आले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते आणि ते यशस्वी झाले नव्हते.

सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृता सिंगसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. त्याने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ब्रेकअप जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. मीदेखील हे अनुभवलं आहे आणि विचार करतो की कदाचित यापेक्षा वेगळं काहीतरी व्हावे. असं होऊ शकत नाही की या सर्व गोष्टींचा त्रास मलाही झाला. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांना सांभाळणं कठीण जातं. मी हा विचार करून स्वतःला समजवतो की त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो आणि जवान होतो.

सैफ म्हणाला की, लोक आधीपासून मानत आले आहेत की पालक ही एक ओळख असते. पण त्यांचे देखील वेगवेगळे जीवन असते. मॉडर्न रिलेशनशीपमध्ये ही गोष्ट समजू शकतात.

मुलांबद्दल सैफ म्हणाला की, कोणत्याही मुलावर घरातील परिस्थितीचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांपासून कोणतीही गोष्ट लपवली नाही पाहिजे. कोणतीही परिस्थिती असेल ती त्यांना सांगितली पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे आणि जीवनात नेहमीच तक्रार करू शकत नाही.

कधी कधी असं देखील होऊ शकतं की, काहींसाठी दोन पालकांचे एकत्र असणं वाईट परिणामदायी ठरू शकतं. एक स्थिर गृहस्थी चांगले वातावरण निर्मिती करते. अशात प्रत्येक नात्यात क्लिएरिटी असणं महत्त्वाचं आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सैफ 'जवानी जानेमन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंग