Join us  

काय सांगता ! लॉकडाऊनमध्ये नवाब सैफवर आली त्याचे राहते घर सोडण्याची वेळ, काय असावे यामागे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 5:04 PM

सैफ अली खान सध्या वांद्रे भागातील फॉर्च्यून इमारतीत आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब सैफ आणि करिना नवीन घराच्या शोधात होते. सैफ अली खान सध्या वांद्रे परिसरातील फॉर्च्यून इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत आहे. तर आई शर्मिला या दिल्लीमध्ये राहतात. सैफचे पतौडी कुटुंब खूप मोठे आहे. त्यामुळे सतत नातेवाईकांची त्यांच्या घरी ये-जा सुरू असते. सैफची बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल अधूनमधून त्यांच्या घरी येतात आणि बर्‍याचदा  सारा आणि इब्राहिमसुद्धा येतात.

सैफचा दुसरी बहीण सबा देखील मुंबईला आली त्यामुळे तिचे येणे जाणे सुरू असते.त्यामुळे सध्या राहत असलेले आलिशान घर त्यांना छोटे पडत होते. त्यामुळे याहूनही मोठे घर घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये सैफिना होते. राहत्या घराच्या समोरच त्यांनी त्यांचा नवीन आशियाना खरेदी केल्याचे चर्चा आहे. 

 

आता त्यांच्या नवीन घराचा शोध पूर्ण झाला असून सैफ लवकरच करीना आणि तैमूरसोबत तिथे राहायला जाणार आहे. सध्या नवीन घरामध्ये इंटेरिअरचे काम चालू आहे जे सैफ त्याच्या देखरेखीखाली करुन घेत आहे.

 

सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान  करतात पतौडी महालाची देखभाल !

गुडगाव इथून २६ किमीवर असलेल्या पतौडी इथं असणारा हा महल म्हणजे पतौडी पॅलेस. नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला. इफ्तिकार अली हुसेन हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते.

 

इफ्तिकार अली हुसेन यांच्यानंतर नवाब घराण्याचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी परदेशी आर्किटेक्टच्या मदतीने पतौडी पॅलेसला आकर्षक डिझाईन केली. ऑस्‍टेलियाचे आर्किटेक्‍ट कार्ल मोल्‍ट हेंज यांच्‍या संकल्पनेतून या भव्य आणि आलिशान महालाची डिझाइन करण्यात आली. टायगर पतौडी यांच्या पश्चात छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान हे या महालाची देखभाल करतात.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर