सैफ अली खानने लेकीला दिला हा महत्त्वाचा सल्ला.. तुम्ही पण नक्की वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:26 IST
सैफ अली खानचा 'शेफ' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाताला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो ...
सैफ अली खानने लेकीला दिला हा महत्त्वाचा सल्ला.. तुम्ही पण नक्की वाचा !
सैफ अली खानचा 'शेफ' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाताला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. तर तिकडे सैफची पत्नी करिना कपूर ही तैमूरच्या जन्मानंतर बॉलिवूडमध्ये वीरे दी वेडिंग चित्रपटातून कॅमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे करिना सध्या तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्यतंरी सैफ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना ती तैमूरला शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जात होती. मात्र निर्मात्यांना त्याचा खर्च परवढला नाही. त्यामुळे तैमूरची जबाबदारी सहाजिकच सैफवर आली. त्यात सैफची मुलगी सारा अली खान ही केदानाथमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती आपल्या चित्रपटाचे शूटिंग हिमालयात करते आहे. हा सगळा ताप सैफच्या डोक्यावर कमी होता की काय यात बहिण सोहा अली खानला सुद्धा मुलगी झाली. त्यामुळे सैफ ऐवढा व्यस्त अभिनेता सध्या बॉलिवूडमध्ये आणखीन कुणी नसले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सैफ आपल्या मुलांच्या बाबातीत नेहमीच प्रॉटेक्टिव्ह असतो. शेफ चित्रपटाच्या निमित्ताने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान तो साराबाबत सांगताना म्हणाला की, गॉसिप आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींना न घाबरण्याचा मी तिला दिला आहे. साराच शांत स्वभावाची मेहनती मुलगी आहे. ती चांगल्या संस्कारांमध्ये वाढली आहे. मला विश्वास आहे ती चित्रपटांमध्ये ही जे काही काम करेल ते चांगलेच करेल. लोक गॉसिप करत राहतात त्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रीत कर. आपले काम नेहमी आपण प्रामाणिकपणे करत राहायचे. ALSO RAED : सारा अली खानमुळे का उडाली सैफ अली खानची रात्रीची झोप..वाचा सविस्तरसध्या सारा केदरानाथच्या टीमसोबत शूटिंग करते आहे. यात तिच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करतो आहे. सारा एक श्रीमंत घरातील मुलगी दाखवण्यात येणार आहे. सुशांत सिंग राजपूत पिट्टूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा पिट्टू श्रीमंत घरातल्या मुलीच्या प्रेमात पडतो. अभिषेक कपूर जवळपास एक वर्ष चित्रपटाच्या कथेवर काम करत होता.