Join us

अर्जुन आणि सैफ 'भूत पोलिस'च्या फायनल शूटिंगसाठी जैसलमेरला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 12:56 IST

'भूत पोलिस'चे जवळपास 75% शूटिंंग पूर्ण झाले आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’च्या शूटिंगसाठी जैसलमेरला गेले आहेत. गुरुवारी (7 जानेवारी) अर्जुनने 'भूत पोलिस'च्या संपूर्ण टीमचा विमानातला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन-सैफ 'भूत पोलिस'चे कलाकार आणि क्रू मेंबर्स दिसतायेत.  

उर्वरित 25% सिनेमाचे शूटिंग होणार जैसलमेरमध्येदैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार 'भूत पोलिस'चे जवळपास 75% शूटिंंग पूर्ण झाले आहे. लॉकडाउननंतर या सिनेमाच्या शूटिंगला धर्मशाला व डलहौजीमध्ये करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण युनिट कुलधारा रोडवरील खासगी हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'बच्चन पांडे'चे शूटिंगही सध्या जैसलमेरमध्ये सुरू आहे. या सिनेमाचे संपूर्ण युनिट बरेच दिवस जैसलमेरमध्ये राहिले आहे.

सैफ-अर्जुन व्यतिरिक्त यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस, जावेद जाफरी 'भूत पोलिस'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार  आहेत. जॅकलिनने खुलासा केला की ती यात सुपर ग्लॅमरस अवतारा दिसणार आहे.रमेश तोरानी आणि अक्षय पुरी या सिनेमाचे निर्माते आहेत. पवन कृपलानी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. भूत पोलिस हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. 

टॅग्स :अर्जुन कपूरसैफ अली खान जॅकलिन फर्नांडिस