Join us  

पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:21 AM

होय, ‘सडक2’ची आतूरतेने प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आजची सकाळ ‘खूशखबर’ घेऊन आली. काही क्षणांपूर्वी भट्ट कॅम्पने ‘सडक2’ची अधिकृत घोषणा केली. 

महेश भट्ट ‘सडक2’ बनवणार, अशी चर्चा दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये सुरू होती. अखेर आज महेश भट्ट यांच्या वाढदिवशी या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. होय, ‘सडक2’ची आतूरतेने प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आजची सकाळ ‘खूशखबर’ घेऊन आली. काही क्षणांपूर्वी भट्ट कॅम्पने ‘सडक2’ची अधिकृत घोषणा केली. 

विशेष म्हणजे, ‘सडक2’ अन्य कुणी नाही तर स्वत: महेश भट्ट दिग्दर्शित करणार आहेत. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वापसी करताहेत. आणखी खास बाब म्हणजे, या चित्रपटात ते पहिल्यांदा आपल्या मुलीला म्हणजे आलिया भट्टला डायरेक्ट करणार आहेत. 

‘सडक2’मध्ये संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य राय कपूर आणि आलिया भट्ट अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.आलियाला पहिल्यांदा डायरेक्ट करणार, या विचाराने महेश भट्ट तूर्तास प्रचंड उत्साहित आहेत. याशिवाय संजय दत्तसोबत दुसºयांदा काम करण्यासाठीही ते उतावीळ आहेत. अलीकडे एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी ही उत्सुकता बोलून दाखवली होती. बॉलिवूडमध्ये कुण्या अभिनेत्याने माझ्यावर आंधळ्यासारखा विश्वास ठेवला असेल तर तो संजय दत्त आहे. तो स्वबळावर स्टार बनला आहे. तो एखाद्या सिंहासारखा आहे. त्याला केवळ प्रेमाची भाषा बोलूनचं नियंत्रित केले जाऊ शकते, असे ते म्हणाले होते.१९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत ‘सडक2’मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. आता ‘सडक2’ कसा रंगतो, ते बघूच. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा.

 

टॅग्स :महेश भटआलिया भटपूजा भटसंजय दत्तआदित्य रॉय कपूर