Join us

‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ पाच भाषांमध्ये होणार रिलीज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 21:40 IST

बॉक्स आॅफिसवर सध्या ‘बाहुबली-२’ची चर्चा असली तरी, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया सचिन तेंडुलकर याच्या आयुष्याचा प्रवास उलगडणाºया बायोपिकचीही ...

बॉक्स आॅफिसवर सध्या ‘बाहुबली-२’ची चर्चा असली तरी, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया सचिन तेंडुलकर याच्या आयुष्याचा प्रवास उलगडणाºया बायोपिकचीही प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. आता याच चित्रपटाविषयीची एक बातमी समोर येत असून, हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे सचिनच्या फॅन्ससाठी हा चित्रपट पर्वणी ठरेल यात शंका नाही. ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले असून, प्रेक्षकांना ते प्रचंड भावले आहे. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांचे मन जिंकेल असेच काहीसे सध्या चित्र आहे. ट्रेलर मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता निर्मात्यांनी हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्याचे ठरविले आहे. आता हा चित्रपट ‘हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ आणि तेलगू’ भाषेत रिलीज केला जाणार आहे. चित्रपट निर्माते रवि भागचंदका यांनी सांगितले की, सचिन तेंडुलकरने अशा युगाची निर्मिती केली आहे, ज्यावर प्रत्येक भारतीयांना गर्व आहे. त्यामुळे या चित्रपटाला भाषेची अडचण येईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. कुठल्याही भाषेत चित्रपटाची कथा प्रेक्षकाला भावणार आहे. हा चित्रपट सचिनच्या आयुष्यावर आधारित असून, लहानपणापासून ते क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. स्वत: सचिनने या चित्रपटात अभिनय केल्याने प्रेक्षकांना त्याला या अंदाजात बघायला नक्कीच आवडेल. हा चित्रपट येत्या २६ मे रोजी रिलीज होणार आहे. सचिनने नुकतेच दिल्ली येथे आयोजित एका इव्हेंटमध्ये त्याचा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. स्मार्टरन कंपनीच्या या लॉन्चिग इव्हेंटमध्ये सचिनने सांगितले की, हा फोन त्याच्या क्रिकेट करिअरवरून प्रेरित आहे. तंत्रज्ञानात भारत झपाट्याने प्रगती करीत आहे. कारण तंत्रज्ञानात भारताला पश्चिमेतील देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. या १०० टक्के भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनीमध्ये सचिनची भागिदारी आहे.