Join us

'लगान'च्या सिक्वेलची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:50 IST

का ही दिवसांपुर्वी बॉलीवुडमध्ये मि.परफेक्शनीस्ट आमिर खान लवकरच त्याचा सुपरडुपर हिट चित्रपट 'लगान'चा सिक्वेल बनवणार असल्याची जोरदार चर्चा होती. ...

का ही दिवसांपुर्वी बॉलीवुडमध्ये मि.परफेक्शनीस्ट आमिर खान लवकरच त्याचा सुपरडुपर हिट चित्रपट 'लगान'चा सिक्वेल बनवणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चित्रपटाची थीमही 'लगान' सारखीच असून नायिकेच्या भूमिकेत प्राची देसाईची वर्णी लागली आहे इथपर्यंत या गप्पा रंगल्या होत्या. मात्र सध्या तरी आमिरच्या जवळच्या सुत्रांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. त्यांच्या मते या सगळ्या अफवा असून तुर्तास तरी त्याचा असा काही विचार नाही. २00१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान' मध्ये आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाला ऑस्करमध्येही नामांकन मिळाले होते.