Join us  

RRR Twitter Reaction: 'फ्लॉवर' नाही फायर निघाला रामचरण आणि Jr NTR चा RRR, ट्विटरवर फॅन्सच्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:02 AM

RRR Twitter Reaction : सिनेमागृहातून सिनेमा बघून बाहेर पडलेले लोक सोशल मीडियावरून रामचरणची जबरदस्त अदाकारी पाहून थक्क झाले आहेत. दोघांच्याही कामांचं कौतुक केलं जात आहे.

RRR Twitter Review : बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा बहुप्रतिक्षित RRR सिनेमा अखेर सिनेमागृहात रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशीच सिनेमा बघणारे लोक सिनेमाबाबत ट्विटरवर रिअॅक्शन देत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून एसएस राजामौली यांनी तब्बल ५ वर्षांनी दिग्दर्शन केलं आहे. सुरूवातीपासूनच या सिनेमाची मोठी क्रेझ होती. कारण यात ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR) आणि रामचरणसारखे (Ram Charan) सुपरस्टार आहेत. सोबतच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमागृहातून सिनेमा बघून बाहेर पडलेले लोक सोशल मीडियावरून रामचरणची जबरदस्त अदाकारी पाहून थक्क झाले आहेत. दोघांच्याही कामांचं कौतुक केलं जात आहे.

काय आहे कथानक?

RRR ची कथा दोन क्रांतिकारकांच्या अवतीभवती फिरते. सिनेमात रामचरणने सीताराम राजू आणि ज्युनिअर एनटीआरने भीमाची भूमिका साकारली आहे. दोघेही खास मित्र आहेत. देशासाठी लढताना दोघांच्या जीवनात अनेक वादळंही येतात. 

ट्विटरवर RRR च्या नावाने अनेक हॅशटॅग ट्रेन्ड करत आहेत. एका यूजरने हा सिनेमा मास्टरपीस असल्याचं म्हटलं आहे. RRR चा सुरूवातीचा भाग बघितलेल्या लोकांनी लिहिलं की, रामचरणच्या कामाने सिनेमात जीव आणला आहे. सोबतच लोक एसएस राजामौलीच्या दिग्दर्शनाचंही कौतुक करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचं बजट ५५० कोटी रूपये आहे. राजामौली यांनी सिनेमातील व्हिएफएक्ससाठी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. डिस्ट्रीब्युशन राइट्स आणि सॅटेलाइट राइट्स महागडे विकले गेले. ओटीटी रिलीज हे सगळं धरून सिनेमाने आधीच ८९० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

टॅग्स :आरआरआर सिनेमाराम चरण तेजाज्युनिअर एनटीआरबॉलिवूड