Join us  

RRR Success Party Videos:  पार्टी तो बनती है...! ‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीत पोहोचले बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 11:18 AM

RRR Success Party: 25 मार्चला रिलीज झालेल्या राम चरण व ज्युनिअर एनटीआरच्या या चित्रपटाने फक्त 12 दिवसांत वर्ल्डवाइड 939.41 कोटींची कमाई केली आहे. अशात पार्टी तो बनती है...!

RRR Success Party:  एस. एस. राजमौलींच्या (S.S. Rajamouli) ‘आरआरआर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अद्यापही सुरू आहे. 25 मार्चला रिलीज झालेल्या राम चरण ( Ram Charan) व ज्युनिअर एनटीआरच्या (Jr NTR) या चित्रपटाने फक्त 12 दिवसांत वर्ल्डवाइड 939.41 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 1000 कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. अशात पार्टी तो बनती है...!

मुंबईत काल रात्री ‘आरआरआर’ची ग्रँड सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज चेहरे दिसले. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही या ‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली.

(video Viral Bhayani )

सोशल मीडियावर ‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यानेही या शानदार पार्टीचे अनेक इनसाईड व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.राजमौली, राम चरण, ज्युनिअर एनटीआर हे या पार्टीचं मुख्य आकर्षण होतं. शिवाय या पार्टीतल्या केकने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतले. चित्रपटाच्या थीमला साजेसा केक कापून राजमौली, राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांनी ‘आरआरआर’च्या यशाचा आनंद साजरा केला.

आलिया व अजय देवगण गैरहजर...पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. पण ‘आरआरआर’मध्ये दिसलेले दोन स्टार यावेळी गैरहजर दिसले. होय, आलिया भट व अजय देवगण या पार्टीत हजर नव्हते. ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र, करण जोहर, जावेद अख्तर, मकरंद देशपांडे, हुमा कुरेशी, दर्शन कुमार, पलक तिवारी, जॉनी लिव्हर, शरद केळकर असे अनेकजण पार्टीला उपस्थित होते.

राम चरण अनवाणी पायानंच आला...  सक्सेस पार्टीत राम चरण काळ्या कपड्यांमध्ये पोहोचला होता. यावेळी तो खूपच क्यूट दिसत होता. पण त्याच्या अनवाणी पायांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

इतकी केली कमाई‘आरआरआर’  हा तामिळ सिनेमा आहे. मात्र हिंदी, तामिळ, मल्याळ, कन्नड भाषेतही तो रिलीज करण्यात आला आहे. ‘आरआरआर’ च्या तेलगू व्हर्जनने 12 दिवसांत 240 कोटी तर तामिळ व्हर्जनने 65 कोटींची कमाई केली. कन्नड व्हर्जनने 75 कोटींचा बिझनेस केला. हिंदी व्हर्जनने  12 दिवसांत 198.09 कोटींचा आकडा पार केला. वर्ल्डवाईड या चित्रपटाने 939.41 कोटींची कमाई केली. आता हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण येत्या 13 व 14 एप्रिलला 3 मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. यात यशचा केजीएफ 2, शाहिद कपूरचा जर्सी आणि थलापति विजयचा बीस्ट या चित्रपटांचा समावेश आहे.  

टॅग्स :आरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीआमिर खान