Join us

‘खुबसुरत’ जोडीचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 21:03 IST

सुत्रांच्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी दुधाच्या जाहीरातीसाठी ते दोघे म्हणे एकत्र आले आहेत. 

‘नीरजा’च्या प्रमोशनमध्ये मस्सकली गर्ल सोनम कपूर बिझी असताना नुकतीच फवाद खानसोबत तिची एक जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोनम कपूर आणि फवाद खान या ‘खुबसुरत’ चित्रपटातील जोडीला आपण सर्वांनीच खुप लाईक केलं. पण, पुन्हा एकदा जर ही जोडी आपल्याला पहायला मिळाली तर? किती मस्त ना! सुत्रांच्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी दुधाच्या जाहीरातीसाठी ते दोघे म्हणे एकत्र आले आहेत. यात एकमेकांचा हात हातात घेऊन ते डान्स करताना दिसत आहेत. एखाद्या परीकथेतील रोमँटिक कपलप्रमाणे ते बॉल रूममध्ये डान्स करताना दिसत आहेत. सोनम एका सुंदर पांढºया रंगाच्या मॅक्सीमध्ये सिंड्रेलासारखी दिसत आहे तर रात्री बारा वाजता तिचा प्रिंस म्हणजेच फवाद खान तिला चहासाठी थांबवू इच्छितो. खरंच किती सुंदर आहे ना हे?सोनम कपूरची बहीण रिहा कपूरच्या आगामी निर्मितीतील ‘बॅटल फॉर बित्तोरा’ चित्रपटासाठी ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. अनुजा चौहान यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित याची कथा असणार आहे.