Join us  

​ ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना कपूर ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2017 7:59 AM

यावर्षी आॅगस्टमध्ये करिना कपूर ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु करतेय. बेबोच्या या आगामी चित्रपटाबद्दल तुम्ही आम्ही सगळेच उत्सूक आहोत. ...

यावर्षी आॅगस्टमध्ये करिना कपूर ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु करतेय. बेबोच्या या आगामी चित्रपटाबद्दल तुम्ही आम्ही सगळेच उत्सूक आहोत. या चित्रपटाबद्दल आमच्याकडे एक नवी आणि तितकीच इंटरेस्टिंग बातमी आहे. होय, ‘प्रेमनाथ रूममेट्स’ हा चित्रपट आठवतोय? आठवत असेल तर यात लीड रोलमध्ये दिसलेला अभिनेता सुमीत व्यास, हा सुद्धा आठवत असेलच. आता तुम्ही म्हणाल, करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ आणि सुमीत व्यासचा काय संबंध. सध्या नाही, पण चर्चा यशस्वी झाली तर सुमीत व्यास या चित्रपटात करिनाचा हिरो असू शकतो. ऐकता ते अगदी खरे आहे.‘वीरे दी वेडिंग’ मध्ये करिना सुमीतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सुमीतसोबत चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या मते, सध्या ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे.सुमीत व्यासALSO READ :  करिना कपूरला करायचेयं, एकूण १९ किलो वजन कमी!‘वीरे दी वेडिंग’साठी करिना कपूर सध्या जोरदार मेहनत करतेय. प्रेग्नंसीदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना धडपडते आहे. गेल्या साडे तीन महिन्यांत करिनाने १७ किलो वजन कमी केले आहे. येत्या काळात करिनाला एकूण १९ किलो वजन कमी करून आपल्या पूर्वीच्या ग्लॅम फिगरमध्ये यायचे आहे.‘वीरे दी वेडिंग’ चे पहिले शेड्यूल दिल्लीत सुरु होणार आहे. याशिवाय चित्रपटातील काही महत्त्वाच्या सीन्सचे शूटींगही दिल्लीतच होणार आहे. यानंतर दुसरे शेड्यूल बँकॉक येथे होणे अपेक्षित आहे. एकंदर काय, तर करिना तयार आणि आता तिचा हिरोही जवळपास तयार आहे. म्हणजेच काय तर, बेबो पुन्हा आपल्या स्टनिंग अवतारात परतण्यास सज्ज आहे.