Join us  

“तू फक्त कपडे घाल आणि ये…चक्क दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आली या अभिनेत्रीला सांगण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:08 PM

सूर्यवंशीसिनेमात कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रणवीर झळकणार आहे. सध्या सिनेमाचे प्रमोशनलाही सुरूवात झाली आहे.

बॉलीवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूर्यवंशी सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात कतरिना कैफ,  अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर झळकणार आहे.  सध्या सिनेमाचे प्रमोशनलाही सुरूवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या प्रमोशनमध्ये त्याने शूटिंगवेळी सेटवर घडलेले काही किस्से सांगितले. स्टारकास्टमध्ये सगळ्यात जास्त कतरिना कैफचीरोहित शेट्टीची डोकेदुखी ठरत होती. सतत काही ना काही प्रश्न विचारण्याच्या तिच्या स्वभावाला रोहित शेट्टी अक्षरक्ष: वैतागला होता. एकतर रोहित शेट्टी पहिल्यांदाच कतरिना कैफसह काम करतोय. या चित्रपटातील भूमिकेचे वय आणि कथेला साजेशी असल्याने कतरिनाला या चित्रपटामध्ये घेतलं,” असं रोहित म्हणाला. 

‘सूर्यवंशी हा मध्यवर्गीयांसाठी बनवलेला चित्रपट आहे.  मुळात मला जास्त खोलात जाऊन मला इतका विचार करायला आवडत नाही. मी एका ठरविक काळानंतर उत्तर देत नाही. म्हणजे ‘करड्या रंगाचा सलवार कमीज चांगला दिसेल का?’ असा प्रश्नही कतरिना  मला विचारायची. शेवटी वैतागुन अगं बाई तो सलवार कमीज आहे. तू डॉक्टरच्या भूमिकेत आहे. काय फरक पडतो रंगाचा. तू तो घाल आणि ये ना सेट वर’ असं मला सांगावं लागलं होतं,” असा किस्सा रोहित शेट्टीने सांगितला. 

 

सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलंय. पुढील ईदला संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर इन्शाअल्लाह हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची भूमिका असलेला सूर्यवंशी हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या. सिनेमाची तारखांच्या क्लॅश टाळण्यासाठी चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं ट्विटर अकाऊंटवरून जाहीर करण्यात आले होते.

टॅग्स :रोहित शेट्टीकतरिना कैफ