Join us  

रोहित रॉयला बंदुकीच्या धाकावर साईन करायला लावला होता सिनेमा, वाचा थरारक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:20 AM

हा किस्सा आहे रोहितच्या स्ट्रगल काळातील. 

ठळक मुद्दे ‘मुंबई सागा’मध्ये रोहित रॉय हा जयकर शिंदे उर्फ बाबाची भूमिका साकारत आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सगळे काही ठप्प पडले होते. पण आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येतेय. बॉलिवूड इंडस्ट्रीतही नवी लगबग सुरु झाली आहे. कलाकार शूटींगवर परतण्याची तयारी करत आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे रोहित रॉय. लवकरचरोहित रॉय जॉन अब्राहमसोबत ‘मुंबई सागा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रोहितला एका गँगस्टरची भूमिका साकारताना प्रेक्षक पाहू शकतील. याच पार्श्वभूमीवर रोहितने एक थरारक किस्सा शेअर केला आहे. होय, हा किस्सा आहे रोहितच्या स्ट्रगल काळातील. त्याकाळात बंदुकीच्या धाकावर रोहितला सिनेमा साईन करावा लागला होता.

काय आहे तो किस्सारोहितला एकदा कॉल आला. पलीकडच्या व्यक्तिने रोहितला चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलवले. रोहित कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला. या ठिकाणी इतका भयावह अनुभव येईल, अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. कथा ऐकवण्याआधीच टेबलावर त्याच्यासमोर बंदुक ठेवली गेली. होकार नाही तर बंदुकीची गोळी, असा त्याचा अर्थ होता. रोहितकडे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. कथा ऐकण्याआधीच त्याला चित्रपटाला होकार द्यावा लागला. बंदुकीच्या धाकारवर त्याच्याकडून हा चित्रपट साईन करून घेण्यात आला. अशापद्धतीने त्याला अंडरवर्ल्डचा अनुभव आला होता. अर्थात सुदैवाने हा सिनेमा कधी तयार झाला नाही.

 ‘मुंबई सागा’साठी गाळला घाम ‘मुंबई सागा’मध्ये रोहित रॉय हा जयकर शिंदे उर्फ बाबाची भूमिका साकारत आहे. यामध्ये रोहित एका गुंडाची भूमिका साकारत आहे.या चित्रपटातील काही दृश्य आणि गाण्यांचे चित्रिकरण शिल्लक असल्याने, पुढील महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असणारे 80 किलो वजन कायम ठेवण्यासाठी रोहितने खूप मेहनत घेतली. ‘मुंबई सागा’ व्यतिरिक्त रोहितने जॉनबरोबर ‘शूटआउट अ‍ॅट वडाला’ मध्ये काम केले आहे तर हृतिकबरोबर तो ‘काबिल’मध्ये दिसला होता.  

टॅग्स :रोहित रॉय