Join us  

MMS लीक झाला अन् बर्बाद झालं या बॉलिवूड अभिनेत्रीचं करिअर, हिची आईदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 2:06 PM

1991 मध्ये बालकलाकार (Child Actress) म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

रिया सेन (Riya Sen) ही या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या कारकिर्द कायम वादात राहिली.  आज रिया सेनचा वाढदिवस आहे. प्रसिद्ध हिंदी आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी अभिनेत्री रिया सेन आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. रियाने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया ही देव वर्मा आणि मुनमुन सेन यांची मुलगी आहे. ती अभिनेत्री रायमा सेनची धाकटी बहीण देखील आहे. रिया सेन त्रिपुराच्या राजघराण्यातील आहे.

रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खानकी हाथ में' या गाण्यातून मिळाली. स्टार किड असूनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकली नाही. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते. आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.रिया तिच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत राहिली. रिया सेनने 2017 मध्ये तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत एका खाजगी समारंभात लग्न केले.

रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा एमएमएस लीक झाला. या व्हिडिओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसले होते. 2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. प्रसिद्धीसाठी रियानेच हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप लोकांनी केला होता. मात्र दोघांनीही हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :रिया सेनबॉलिवूड