रिआलिटी शोमध्ये रविना ‘शायनिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:31 IST
अभिनेत्री रविना टंडन बॉलिवूडमधील मेन स्ट्रीमपासून बाजूला पडलेली असली तरी तिची क्रेझ अद्यापही कायम आहे. ‘शाईन इंडिया’ या डान्स ...
रिआलिटी शोमध्ये रविना ‘शायनिंग’
अभिनेत्री रविना टंडन बॉलिवूडमधील मेन स्ट्रीमपासून बाजूला पडलेली असली तरी तिची क्रेझ अद्यापही कायम आहे. ‘शाईन इंडिया’ या डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिला प्रत्येक भागासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये मिळणार आहेत.टेलिव्हिजनवर काम करणाºया बालिवूडमधील अभिनेत्रींना मिळणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम ठरली आहे. रविनापूर्वी माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी यांनी टेलिव्हिजने शोमध्ये काम करताना प्रत्येक भागाकरिता १ कोटी रुपये आकारले होते. एकेकाळी ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून बॉलीवूड गाजवणाºया रविनाने याआधी ‘साहिब बिबी गुलाम’, ‘छोटे मिया’, ‘कॉमेडी का महामुकाबला’ आणि सिंपली बाते विथ रविना’ या टेलिव्हिजन शोजमध्ये आपली छाप सोडली आहे. ‘शाईन इंडिया’ या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेता गोविंदा आणि नृत्यदिग्दर्शिका सरोज खान हे दिग्गजदेखील परीक्षकांच्या भूमिकेत असतील.‘चॅनेल व्ही’वर पुढील महिन्यात हा शो प्रसारित होणार आहे. परीक्षकांच्या भूमिकेत तिची नवी इनिंग असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूड अभिनेत्रीपैकी रविनापूर्वी माधुरी व सोनाली बेंद्रे हिेने परीक्षक म्हणून ख्याती मिळविली आहे हे विशेष...