Join us

'रिस्की' रणबीर आवडतो -अनुराग बसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:06 IST

दिग्दर्शक अनुराग बासू आणि रणबीर कपूर यांची जोडी 'बर्फी' पासून हिट आहे. रणबीरला चित्रपटात घेणे अनुराग शुभ मानतो. अनुराग ...

दिग्दर्शक अनुराग बासू आणि रणबीर कपूर यांची जोडी 'बर्फी' पासून हिट आहे. रणबीरला चित्रपटात घेणे अनुराग शुभ मानतो. अनुराग स्वत:ही खुप आव्हानांना पेलतो. त्यामुळे रिस्क घेणारा रणबीरही खुपच आवडतो. सतत फ्लॉप चित्रपट करून रणबीर तेवढय़ाच ताकदीने आणि आशेने येणार्‍या नव्या चित्रपटाकडून अपेक्षा ठेवतो. अनुराग बासूचंही तसेच आहे. त्यालाही रिस्क घ्यायला प्रचंड आवडते. अनुराग म्हणतो,' मला बोअरिंग सलमानपेक्षा रिस्क घेणारा रणबीर जास्त आवडतो. ' जग्गा जासूस साठीही अनुराग रणबीरकडून खुप अपेक्षा ठेवून आहे. एखादा चित्रपट रसिकांच्या मनात घर करू अथवा न करू रणबीरच्या चित्रपटांमुळे चित्रपट साकारल्याचा आनंद तर मिळतो. तो यात अनेक भूमिका साकारत असून त्या एकमेकांपेक्षा अगदीच वेगळ्या आहेत. काही थोडे अभिनेते असे करू शकतात, असे अनुराग सांगतो.