Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणावर बसरले ऋषी कपूर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:35 IST

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे गुरुवारी निधन झाले. गुरुवारी संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना गेल्या ही ...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे गुरुवारी निधन झाले. गुरुवारी संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना गेल्या ही बातमी बॉलिवूडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. विनोद खन्ना यांच्या जाण्याने त्यांचे सहकलाकार आणि मित्र ऋषी कपूर हे दु:खी तर झालेत मात्र ते रागातही आहेत. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जे आजच्या पिढीतील कलाकार गैरहजर राहिले त्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. तसेच विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांपैकी जे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी  आले नाहीत त्यांच्यावरही ते चांगले भरसले आहेत. ऋषी कपूर यांनी ट्वीट करुन आपला राग व्यक्त केला आहे,'' प्रियांका चोप्राच्या पार्टी रात्री चमचे दिसले होते मात्र विनोद खन्ना यांच्याअंत्यसंस्कारच्यावेळी यांच्यापैकी कोणी दिसले नाही. एवढ्यावरच ते थांबले नाहीत पुढे ते म्हणाल, मी या गोष्टीसाठी सुद्धा तयार आहे उद्या मी मेल्यावरही मला कोणी कांधा द्यायला येणार नाहीत. माझा मुलगा रणबीर आणि पत्नी नीतू सिंग सध्या परदेशी आहेत नाहीतर ते विनोद खन्ना यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले असते.  विनोद खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करायला बिग बी अतिमाभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन रामपाल आले होते  मात्र बॉलिवूडमधील तीन खानांपैकी एक ही खान याठिकाणी दिसला नाही. मात्र सलमान खानने विनोद खन्ना यांच्यासोबतचा दंबगच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर करुन श्रद्धांजली वाहिली होती. विनोद खन्ना यांनी आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत.