Join us  

ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला होता शाहरूखला 'डर'मधील रोल, त्यांनी नाकारली होती ऑफर

By अमित इंगोले | Published: October 24, 2020 12:50 PM

'बाजीगर' आणि 'डर' शाहरूख खानच्या करिअरचे असे दोन सिनेमे आहेत ज्यांनी त्याला एक अभिनेता म्हणून समोर आणलं. दोन्ही सिनेमात शाहरूखने निगेटीव्ह रोल केले होते.

शाहरूख खानला बॉलिवूडचा बादशाह असं म्हटलं जातं. सोबतच त्याला बॉलिवूडचा रोमान्स किंगही म्हटलं जातं. पण हे यश त्याला एकाएकी मिळालं नाही. बॉलिवूडमध्ये सर्वात वरच्या स्थानावर पोहचण्यासाठी त्याला मोठा स्ट्रगल करावा लागला. भलेही त्याला त्याच्या रोमॅंटिक अंदाजासाठी ओळखलं जातं. पण त्याने आपली ओळख निगेटीव्ह आणि ग्रे शेड असलेल्या भूमिकेतून निर्माण केली होती. 'बाजीगर' आणि 'डर' शाहरूख खानच्या करिअरचे असे दोन सिनेमे आहेत ज्यांनी त्याला एक अभिनेता म्हणून समोर आणलं. दोन्ही सिनेमात शाहरूखने निगेटीव्ह रोल केले होते. पण त्याला 'डर' सिनेमातील रोल कुणी मिळवून दिला होता हे अनेकांना माहीत नसेल.

ऋषी कपूर यांनी शाहरूख नाव केलं सजेस्ट

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिले की, यश चोप्राने 'डर' ली निगेटीव्ह रोल त्यांना ऑफर केला होता. पण त्यांनी तो रोल नाकारला. ऋषी कपूर यांनी हेही लिहिले की, त्यांनीच या रोलसाठी शाहरूख खानचं नाव सजेस्ट केलं होतं. शाहरूखने आधीच ऋषी कपूर यांच्यासोबत 'दिवाना' सिनेमात काम केलं होतं. आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की, शाहरूख 'डर'मधील निगेटीव्ह रोल साकारण्यासाठी सक्षम आहे.

सनी देओलचा रोलही झाला होता ऑफर

ऋषी कपूर यांना 'डर' सिनेमातील मुख्य भूमिकाही ऑफर झाली होती. जी सनी देओलने साकारली होती. ऋषी कपूर यांनी ही भूमिका नाकारली होती कारण ही भूमिका व्हिलनच्या भूमिकेसमोर फारच कमजोर होती. नंतर या भूमिकेबाबत सनी देओलने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. कारण त्याला सिनेमाच्या सुरूवातीला त्याला सांगण्यात आलं नव्हतं की, व्हिलनची भूमिका जास्त वजनदार केली आहे. 'डर' सिनेमा प्रेक्षकांना फारच पसंत पडला होता. याला नॅशनल अवॉर्डही मिळाला होता. या सिनेमाबाबत मानलं जातं की, या सिनेमातील भूमिकेने शाहरूखला बॉलिवूडमध्ये हिरोच्या रूपात समोर आणलं. 

टॅग्स :ऋषी कपूरशाहरुख खानबॉलिवूड