Join us

रिचा चढ्ढाने म्हटले, ‘जीन्स घालते म्हणून मी लग्नाचे मटेरियल नाही काय?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:36 IST

अभिनेत्री रिचा चढ्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फुकरे रिटर्न्स’ रिलीज होण्याअगोदरच रिचाने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. ...

अभिनेत्री रिचा चढ्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फुकरे रिटर्न्स’ रिलीज होण्याअगोदरच रिचाने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिने वेस्टर्न कपडे परिधान करणाºया मुलींबद्दल वेगळा विचार करणाºया लोकांवर निशाना साधताना एक ट्विट केले आहे. रिचाने ट्विटमध्ये असा विचार करणाºया लोकांना प्रश्न केला की, ‘मला इंडियन ड्रेसपेक्षा वेस्टर्न कपडे घालायला आवडतात, मग मी लग्न करण्यास लायक नाही काय? माझी ही आवड मला नॉट शादी मटेरियल बनविते काय?’ रिचाच्या या ट्विटला अनेक ट्विटर यूजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. काही यूजर्सनी म्हटले की, रिचा चढ्ढाला लग्न करण्यास कोणी अडविले, ती केव्हाही लग्न करू शकते. तर काहींनी म्हटले की, ‘कपडे कोणते घालतेस याचा लग्नाशी काहीही संबंध नाही. तू लग्नासाठी परफेक्ट मटेरियल आहेस.’यावेळी रिचाने केवळ तिच्या लग्नाविषयीचेच स्टेटमेंट केले नाही तर, तिचा एक बोल्ड फोटोही तिने शेअर केला. या फोटोमुळेदेखील रिचा सध्या भलतीच चर्चेत आली आहे. रिचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला. फोटोमध्ये रिचा बॅक प्रोफाइल दाखविताना दिसत आहे. रिच्याचा हा फोटो खूपच बोल्ड आहे. या फोटोला कॅप्शन देताना रिचाने लिहिले की, ‘स्वत:वर विश्वास ठेवा’रिचा लवकरच तिच्या आगामी ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात पुलकित सम्राट, अली जफर आणि मनजोत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चुचा म्हणजेच वरुण शर्मा पुन्हा एकदा भविष्यात घडणाºया घटनांचे स्वप्न बघणार आहे, तर भोली पंजाबन म्हणून पुन्हा एकदा रिचा दमदार भूमिकेत दिसणार आहे.