Join us  

रिचा चड्डा सांगतेय, असा होता अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 7:15 AM

रिचा चड्डा आणि अक्षय खन्ना यांच्या सेक्शन 375 चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देमी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी अक्षयला तितकीशी ओळखत नव्हते. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून आमच्यात एक प्रोफेशनल नाते निर्माण झाले.

रिचा चड्डा आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या सेक्शन 375 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबाबत रिचाशी मारलेल्या गप्पा...सेक्शन 375 या चित्रपटातील तुझ्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या भूमिकेविषयी काय सांगशील?सेक्शन 375 हा चित्रपट एका अतिशय नाजूक विषयावर आधारित असून या चित्रपटातील माझी भूमिका ही आव्हानात्मक आहे. या चित्रपटात मी एका वकिलाची भूमिका साकारत असून एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे. या चित्रपटात उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कलाकार यांची चांगली भट्टी जमून आली आहे. अजय बहल खूप चांगले दिग्दर्शक असून त्यांनी या चित्रपटाचे खूप चांगले दिग्दर्शन केले आहे.

सेक्शन 375 या चित्रपटाद्वारे काही संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का?या चित्रपटात प्रत्येक गोष्टींच्या दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे खऱ्या गोष्टी लोकांच्या समोर येणार आहेत. हा चित्रपट बनवताना खूप संशोधन करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आली असल्यामुळे कलाकार म्हणून आमच्यासाठी काम करणे खूप सोपे गेले. या चित्रपटाद्वारे आम्ही कोणताही संदेश दिलेला नाही. प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे काय समजून घ्यायचे हे आम्ही त्यांच्यावर सोडले आहे. कोण योग्य आणि कोण चुकीचे हे लोकांनी ठरवायची गरज आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी या गोष्टीवर बोलायला तरी सुरुवात करावी असे मला वाटते.

अक्षय खन्नासोबत तुझा हा पहिला चित्रपट आहे, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?मी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी अक्षयला तितकीशी ओळखत नव्हते. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून आमच्यात एक प्रोफेशनल नाते निर्माण झाले. अक्षय हा खूप चांगला अभिनेता असून त्याच्या भूमिकेचे बारकावे त्याला माहीत असतात. त्यामुळे एखादी भूमिका कशाप्रकारे साकारायची हे त्याच्या डोक्यात पक्कं असतं. मी या चित्रपटात सरकारी वकिलाच्या भूमिकेत आहे तर अक्षय गुन्हेगाराचा वकील आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात केस लढत आहोत.

अली फजल आणि तुझी जोडी तुझ्या चाहत्यांना प्रचंड आवडते, तुमच्या लग्नाची ते आतुरतेने वाट पाहात आहेत.आमच्या लग्नाचे प्लानिंग करायचे झाल्यास संपूर्ण प्रॉडक्शन टीम लागेल. अली आणि माझ्या प्रॉडक्शन टीमला यासाठी एकत्र यावे लागेल. कारण सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत. सध्या अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही. अनेकदा आम्ही महिन्यातून केवळ दोनदा भेटतो. कधी कधी तर अंधेरी ते वांद्रे हे अंतरही खूप जास्त असल्यासारखे वाटते. अली पहाटे पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडीओ कॉलवरून बोलतो. अशा परिस्थिती आम्ही लग्न कसे करू शकतो? त्यामुळे सध्या तरी लग्नाचा काहीही विचार नाहीये.

टॅग्स :रिचा चड्डासेक्शन ३७५अक्षय खन्ना