Join us

नवीन बकरा भेटला, रिया चक्रवर्तीचा हा फोटो पाहून महेश भट्ट आठवले, उमटतायेत संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 11:37 IST

अनुषा दांडेकरच्या बर्थ डे पार्टीमध्येही  रिया एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी अनुषापेक्षा रियानेच जास्त लक्षवेधी ठरली. रिया चक्रवर्ती सोबत फरहान अख्तर आणि एमटीव्ही रोडीजचा जज लक्ष्मणसुद्धा अनुषाच्या पार्टीत दिसले होते.

रिया चक्रवर्ती नाम तो सुनाही होगा असेच काहीसे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सारे काही विसरुन रिया आता पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्जॉय करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच रिया मुंबईत घर शोधत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. जिथे रिया जाते तिथे मीडिया तिचा पिच्छा करते या गोष्टीला कंटाळून रिया दुस-या घराच्या शोधात असल्याचे चर्चा होत्या.

नुकतेच अनुषा दांडेकरच्या बर्थ डे पार्टीमध्येही  रिया एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी अनुषापेक्षा रियानेच जास्त लक्षवेधी ठरली. रिया चक्रवर्ती सोबत फरहान अख्तर आणि एमटीव्ही रोडीजचा जज लक्ष्मणसुद्धा अनुषाच्या पार्टीत दिसले होते. राजीवने इंस्टाग्रामवर रियाबरोबरचा एक फोटोही शेअर केला असून,  'माय गर्ल' असे या फोटोला त्याने कॅप्शनही दिले होते. राजीवसह त्याची पत्नी सुझान लक्ष्मणही या पार्टीत हजर होती.

सुजैन लक्ष्मणने या पार्टीचा ग्रुप फोटोही शेअर केला असून, या पार्टीत कोण उपस्थित होते हे स्पष्टपणे दिसून येते. राजीवसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर यूजर्स कमेंट करत आहेत.नवीन बकरा मिळालेला दिसतोय रियाला. अशा कमेंटस करत तिच्या या फोटोवर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो पाहून महेश भट्ट यांची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.

 

महेश भट्टसह रियाचे चांगले संबंध होते.महेश भट्ट गरज पडल्यास तिला काय करावे काय करु नये या गोष्टीही सांगत. रियाच्या करिअर मध्ये महेश भट्ट यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शाखाली जसे ते सांगत तसे रिया करायची. सुशांतच्या निधनावेळी महेश भट्टच्या सांगण्यावरुनच तिने त्याला एकेट सोडून घर सोडले होते. 

रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियासोबत जे काही घडले, ते संपूर्ण जगाने पाहिले. गेल्या काही महिन्यात यामुळे ती सतत चर्चेत आहेत. आता याचा फायदा मेकर्स घेणार नाहीत, असे कसे होणार? मेकर्सच्या मते, रियासोबत जे काही घडले, ज्यामुळे ती चर्चेत राहिले, त्यानंतर तिच्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. अशात तिचा सिनेमा रिलीज होणार म्हटल्यानंतर या सिनेमालाही तिच्या नावाचा फायदा होणार. याचमुळे ‘चेहरे’चा भाव वाढवण्यात आला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या सिनेमासाठी मोठमोठी बोली लावली आणि अखेर हॉटस्टारने बाजी मारली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी हॉटस्टारने मोठी रक्कम मोजली आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीमहेश भट