Join us

मोबाईल क्लोन केल्यानंतर झाले धक्कादायक खुलासा, रिया होती ड्रग्सच्या व्यवसयात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 12:01 IST

रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसते आहे.

रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सुशांताला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबियांनी लावला आहे. यासोबतच रियाचे ड्रग्स कनेक्शन समोर आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली. आता बातमी येत आहे की तपास एजन्सीने रियाचा फोन क्लोन केला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

टाईम नाऊ रिपोर्टनुसार, रियाचा फोन क्लोन केल्यावर बरीच माहिती समोर आली आहे. रिया अवैध ड्रग्सच्या खरेदी विक्रित असल्याचा आरोप आहे. रियाने ड्रग्स स्वत: बाळगले आहे आणि त्यांचा वापर केला. एनसीबी अंतर्गत या गोष्टी गुन्हा आहेत. 

रिया म्हणाली होती ती ड्रग्स घेत नाहीरिपोर्ट्स नुसार, एनसीबी आता दिपेश सावंता समन पाठवणार आहे.दिपेश सुशांतच्या घरात हाऊसहेल्प करायचा. रियाचे काही चॅट्स व्हायरल झाले आहेत, त्यात तिने ड्रग्स घेण्याचे सांगितले होते. मात्र मुलाखती दरम्यान रिया म्हणाली होती ती ड्रग्स घेत नाही. सुशांत गांजा घ्यायचा. 

चौकशीत शोविकने रियासोबत ड्रगसंबंधी केलेले चॅट खरे असल्याचे कबुल केले आहे. यामुळे शोविकच रियासाठी मोठी अडचण ठरला आहे. या चॅटमध्ये रिया कोणत्यातरी व्यक्तीसाठी शोविककडे ड्रग्ज मागत आहे. यामुळे शोविकच्या म्हणन्यानुसार रियालाही अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती