खुलासा : आमिर खानला ‘हा’ किसिंग सीन करताना फुटला होता घाम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 17:33 IST
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता आमिर खान याचे सर्व चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातील बरेचसे चित्रपट असे आहेत की, ...
खुलासा : आमिर खानला ‘हा’ किसिंग सीन करताना फुटला होता घाम!!
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता आमिर खान याचे सर्व चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातील बरेचसे चित्रपट असे आहेत की, ज्यामध्ये अंगप्रदर्शन न करताही या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर कोट्यवधी रुपयांची लयलूट केली आहे. वास्तविक आमिर स्वत:च अभिनयाला विशेष महत्त्व देत असल्याने त्याच्या चित्रपटात हॉट सीन्स अपवादानेच बघावयास मिळतात. मात्र ज्या काही चित्रपटांमध्ये त्याने हॉट सीन्स (किसिंग सीन) दिले आहेत, ते करताना त्याला अक्षरश: घाम फुटला होता, असा खुलासा समोर येत आहे. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल’, ‘इश्क’, ‘मन’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांमध्ये आमिरने लिप लॉक सीन्स दिले आहेत. वास्तविक सद्यस्थितीचा विचार केल्यास चित्रपटांमध्ये लीप लॉक सीन्स ही बाब कॉमन आहे. मात्र आमिरच्या या सीन्सची आजही चर्चा रंगत असल्याने प्रत्येकाला त्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण पडद्यावर हे सीन्स बघून आमिरच्या छबीविरुद्ध वाटत असले तरी, त्यालादेखील असे सीन्स देण्यात काहीच वावगे वाटत नसावे असेच एकंदरीत दिसते. मात्र अभिनेत्री पूजा बेदी हिने आमिरच्या किसिंग सीन्सविषयी केलेला खुलासा धक्कादायक आहे. कारण तिच्या मते हे सीन्स देताना आमिरची हालत प्रचंड खराब झाली होती. त्याला अक्षरक्ष: घाम फुटला होता. जेव्हा जेव्हा त्याने अशाप्रकारचे सीन्स दिले तेव्हा तेव्हा त्याने सेटवरून पळ काढला होता. एका मुलाखतीदररम्यान पूजा बेदीने म्हटले की, ‘आतंक ही आंतक’ या चित्रपटात जेव्हा आमिर खानने माझ्यासोबत लिप्स किसिंग सीन्स दिला होता, तेव्हा त्याची स्थिती खूपच नाजूक झाली होती. सीन व्यवस्थित व्हावा म्हणून त्याने बºयाचदा रिटेकही घेतला. परंतु अशातही त्याला परफेक्ट सीन देता आला नाही. अखेर त्याने सेटवरून काढता पाय घेत रूम गाठली. मीदेखील त्याच्या पाठोपाठ रूममध्ये गेली. काही मिनिटे आम्ही एकमेकांकडे बघितले नव्हते. त्यानंतर अचानकच आमिरने मला म्हटले की, ‘आपण चेस खेळुया काय?’ मी त्याला लगेचच होकार दिला. काही वेळानंतर सर्व वातावरण शांत झाले. आमिरनेदेखील किसिंग सीनला बगल दिली. कालांतराने चित्रपटातूनच हा सीन काढण्यात आला. या चित्रपटात पूजाने गेस्ट अपीयरेंस म्हणून काम केले होते. चित्रपटात तिने गंगा नावाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट दिलीप शंकर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात आमिरच्या अपोझिट अभिनेत्री जुही चावला होती. सुरुवातीला निर्मात्यांनी या चित्रपटात शाहरूख खान आणि रजनीकांत या जोडीला साइन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या दोघांचे डेट्स मिळत नसल्याने आमिर खानच्या नावाचा विचार केला गेला. पुढे जेव्हा जेव्हा आमिरवर किसिंग सीन देण्याचा प्रसंग ओढावला तेव्हा तेव्हा त्याची हालत नाजूक झाल्याचाही खुलासा पूजाने केला.