Join us  

प्रजासत्ताक दिनी वाघा बॉर्डरवर पोहोचली ‘उरी’ची टीम, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 10:10 AM

काल प्रजासत्ताक दिनी ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ची अख्खी टीम वाघा बॉर्डरवर पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर विकी कौशल व यामी गौतम यांनी भारतीय जवानांना सलामी दिली.

ठळक मुद्देअतिशय कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने आत्तापर्यंत १३० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

अलीकडेच विकी कौशलयामी गौतम स्टारर ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बॉक्सआॅफिसवर चित्रपटाने प्रचंड धूम केली. जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने सर्जिकल स्ट्राइकने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच सर्जिकल स्ट्राइकवर आधारित  आहे. काल प्रजासत्ताक दिनी ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ची अख्खी टीम वाघा बॉर्डरवर पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर विकी कौशलयामी गौतम यांनी भारतीय जवानांना सलामी दिली. सोबतचं त्यांच्यासोबत धम्माल मस्ती केली.

चित्रपटात मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारणा-या विकी कौशलने यावेळी जवानांना ‘हाऊ इज द जोश?’ असा प्रश्न केला. यावेळी देशांच्या वीर जवानांनी काय उत्तर दिले, याचा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.

यामी यावेळी भरभरून बोलली. चित्रपटाच्या शूटींग व प्रमोशनदरम्यान मला सतत भारतीय जवानांशी भेटण्याचे सौभाग्य लाभले. देशासाठी आपले जवान जीवाची बाजी लावतात, अतिशय प्रतिकूल वातावरणात शत्रूंशी दोन हात करण्यासाठी कायम सज्ज असतात. त्यांचा त्याग, त्यांचे धैर्य, त्यांचे बलिदान या सगळ्यांमुळे या चित्रपटात मला सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली, असे ती म्हणाली.अतिशय कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने आत्तापर्यंत १३० कोटी रूपयांची कमाई केली आहे. परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी आदींनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :उरीविकी कौशलयामी गौतम