Join us  

‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 1:09 PM

होय, ‘छपाक’ जिच्या आयुष्यावर आधारित आहे, ती लक्ष्मी अग्रवाल ट्रेलर रिलीजनंतर नाराज असल्याचे कळतेय.

ठळक मुद्दे येत्या 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

अ‍ॅसिड हल्ल्यातून सावरून जिद्दीने आयुष्य उभ्या करणा-या लक्ष्मी अग्रवालची कहाणी सांगणारा ‘छपाक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या चित्रपटात लक्ष्मीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. अंतर्मन हेलावून टाकणारा हा ट्रेलर पाहून प्रत्येकाने दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक केले. पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, ‘छपाक’ जिच्या आयुष्यावर आधारित आहे, ती लक्ष्मी अग्रवाल ट्रेलर रिलीजनंतर नाराज असल्याचे कळतेय.

होय, बॉलिवूड हंगामाने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात लक्ष्मी अग्रवाल सध्या नाराज असल्याचे सांगितले  आहे. होय, या चित्रपटाच्या कॉपीराईटसाठी लक्ष्मीला 13 लाख रूपये दिले गेले होते. त्यावेळी या रकमेबद्दल लक्ष्मीची काहीही तक्रार नव्हती. पण आता ती अधिक रकमेची मागणी करत असल्याचे समजतेय. यामुळे तिच्यात आणि ‘छपाक’च्या मेकर्समध्ये वाद सुरु झाल्याचीही चर्चा आहे.

2005 मध्ये एकतर्फी प्रेम करणा-या एका मुलाने लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात लक्ष्मीचा चेहरा पूर्णत: बिघडला होता. पण याऊपरही लक्ष्मी खचली नाही. तिने कायदेशीर लढाई लढली. तिच्या बुलंद इराद्यामुळे छोट्या दुकानांमध्ये अ‍ॅसिडच्या विक्रीबद्दल कठोर कायदा बनला.

तिची हीच संघर्षकथा ‘छपाक’मध्ये दाखवण्यात आली आहे. दीपिकाने तिच्या रूपात लक्ष्मीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली आहे. दीपिकाशिवाय विक्रांत मेस्सी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

टॅग्स :छपाकदीपिका पादुकोण