Join us  

रेणुका शहाणे म्हणते, ‘शहाणे’ बना; सावध राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 11:13 AM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. 

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी रेणुकाने भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते.‘ तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ असा टोला रेणुका तिने लगावला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. निवडणुकीदरम्यान ‘शहाणे’ बना आणि डोळसपणे मतदान करा, असे आवाहन रेणुकाने केले आहे.‘निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अचानक ‘सामान्य’ नागरिकांसारखे बस, ट्रेन, मेट्रोमधून प्रवास करतील. गरीबाच्या झोपडीत जावून भोजन करतील. शेतकऱ्यांसोबत राबताना दिसतील. नागरीक या नात्याने या उमेदवारांचे गत पाच वर्षांचे वर्तन आणि काम आपण बघायला हवे. आपले प्रत्येक मत मोलाचे आहे. सावध राहा,’ असे ट्वीट रेणुका शहाणेने केले आहे.

रेणुकाचे हे ट्वीट वाचून अनेकांनी तिला पाठींबा दिला आहे. याऊलट काहींनी तिला ट्रोल केले आहे. रेणुकाने या ट्वीटमधून हेमा मालिनी आणि संबित पात्रा सारख्या राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे, असे अनेकांचे मत आहे. अलीकडे हेमा मालिनी शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर चालवताना व त्यांच्यासोबत राबताना दिसल्या होत्या. तर संबित पात्रा गरीबांच्या घरी जेवताना दिसले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी रेणुकाने भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते. अलीकडे काँग्रेसने सोशल मीडियावर ‘चौकीदार चोर है’ अशी मोहिम उघडली होती. याच मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’असे नवीन नाव ठेवण्यात आले होते. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले होते. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली होती. ‘ तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ असा टोला रेणुका तिने लगावला होता.

टॅग्स :रेणुका शहाणे