Join us  

अशा व्यक्तिला तिकीट का देता? आझम खान यांच्यावर संतापल्या रेणुका शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:52 AM

भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्यावर तूर्तास सर्वस्तरातून टीका होतेय. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत, अशा व्यक्तिला उमेदवारीच मिळू नये,अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी रेणुका शहाणे यांनी भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते.

भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्यावर तूर्तास सर्वस्तरातून टीका होतेय. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत, अशा व्यक्तिला उमेदवारीच मिळू नये,अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.जया प्रदा उत्तर प्रदेशातील रामपूरमधून आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. एका प्रचारसभेत आझम खान यांनी जयाप्रदा यांना लक्ष्य करत, त्यांच्याविरोधात अतिशय असभ्य भाषेचा वापर केला.आझम खान या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगाने त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली. शिवाय निवडणूक आयोगानेही त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी लादली. रेणुका शहाणे यांनीही ट्विटरवर याबद्दज जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली.

महिलांचा आदर न राखता त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर करणा-या आझम खानसारख्या व्यक्तिंना कदापि उमेदवारी मिळता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण तेवढ्याचे भागणारे नाही. प्रत्यक्ष कारवाईची गरज आहे. ही कारवाई होईल का? हा प्रश्न आहे. मुळातच त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्यावी परवानगीच देता कामा नये, असे ट्विट रेणुका शहाणे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनाही टॅग केले आहे.

काही दिवसांपूर्वी रेणुका शहाणे यांनी भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते. अलीकडे काँग्रेसने सोशल मीडियावर ‘चौकीदार चोर है’ अशी मोहिम उघडली होती. याच मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’असे नवीन नाव ठेवण्यात आले होते. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले होते. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली होती. ‘ तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’  असा टोला त्यांनी लगावला होता.

टॅग्स :रेणुका शहाणेजया प्रदा