Join us  

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 6:03 PM

रेमोला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलविण्यात आले असून येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्दे रेमोचा जन्म 2 एप्रिल 1974 साली बेंगळुरुमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजा याला दुपारी रेमोला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.प्राप्त माहितीनुसार,  डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली आहे.  प्राथमिक वृत्तात रेमो आयसीयूत असल्याची माहिती होती. मात्र एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेमोची प्रकृती स्थिर असून तो आयसीयूत नाही.  

रेमो हा बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, आणि  स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस आणि  झलक दिखला जा  यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो जजच्या भूमिकेत दिसला आहे.  याच रिअ‍ॅलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला आणि त्याचसोबत रिअ‍ॅलिटी शोमधून पुढे आलेले स्पर्धक सेलिब्रिटी म्हणून प्रकाशझोतात आले.

स्ट्रगल आणि स्ट्रगल...

 रेमोचा जन्म 2 एप्रिल 1974 साली बेंगळुरुमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रेमोचे वडील गोपी नायर हे इंडियन एयरफोर्सचे आॅफिसर होते. रेमोला आज जे यश मिळाले आहे त्यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावे लागले.रेमोने 10 वीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील जामनगरमधून पूर्ण केले. रेमोच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांने एअरफोर्स ज्वाईन करावे मात्र रेमोला डान्समध्ये करिअर करायचे होते. रेमोने डान्ससाठी कोणतीच प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेली नाही. शाळेत तो अनेक वेळा फंक्शना डान्स करायचा.   चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओ बघून डान्स शिकला आहे.  मित्रांच्या मदतीने तो मुंबईत आला. त्यांने मुंबईत डान्स अ‍ॅकडेमी सुरु केली. सुरुवातीला त्याच्याकडे फक्त 4 स्टुडेंट्स होते ज्यांची संख्या हळुहळु वाढत गेली.   पावसाळ्यात त्याच्याकडे डान्स शिकायला कोणीच यायचे नाही. त्यामुळे त्याच्याकडे जेवायला पैसे नसायचे.  पण रेमो हिंमत हरला नाही. आज तो बॉलिवूडचा दिग्गज सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.

टॅग्स :रेमो डिसुझा