Join us  

आमीर अलीने हॉस्पिटलमधून शेअर केला रेमो डिसुजाचा फोटो, म्हणाला - भाई वापस आ गया....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:10 PM

नुकताच त्याचा मित्र आमीर अलीने रेमोचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो चॅम्पियनसारखे बायसेप्स दाखवताना दिसत आहे.

कोरिओग्राफर-डिरेक्टर रेमो डिसुजाला काही दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक आला होता. ज्यानंतर त्याला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता रेमोच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. तो आता लवकर लवकर बरा होत आहे आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर येत आहेत. नुकताच त्याचा मित्र आमीर अलीने रेमोचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो चॅम्पियनसारखे बायसेप्स दाखवताना दिसत आहे.

पण याच रेमोचा चेहरा दिसत नाहीये आणि तरी सुद्धा याचा अंदाज नक्की लावला जाऊ शकतो की, रेमोची तब्येत आता आधीपेक्षा बरीच चांगली झाली आहे. जे फोटो अलीने शेअर केले आहेत ते सेल्फी आहेत ज्याच्या बॅकग्राउंडला रेमो दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अलीने लिहिले की, माझा भाऊ परत आलाय. 

दरम्यान नुकताच रेमोच्या पत्नीनेही व्हिडीओ पोस्ट करून रेमोच्या तब्येतीबाबत अपडेट दिलं होतं. रेमोची वाइफ लिजने जो व्हिडीओ शेअर केल ज्यात रेमो पाय थिरकवताना दिसत होता. व्हिडीओ शेअर करताना लिजने लिहिले की, 'पायांनी नाचणं वेगळं असतं आणि मनाने थिरकणं वेगळं असतं. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद'.

रेमो डिसुजाला शुक्रवारी दुपारी साधारण २.३० वाजता हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर रेमोच्या हार्टमधून ब्लॉकेज काढल्यानंतर आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर रेमो सध्या काही डान्स रिअॅलिटी शोचा जज आहे. तर काही आगामी सिनेमांच्या दिग्दर्शनाचंही प्लॅनिंग करत आहे. 

टॅग्स :आमिर अलीरेमो डिसुझाबॉलिवूड