Join us  

आता अशी दिसते सनी देओलची हिरोईन, गेल्या २५ वर्षापासून बॉलिवूडमधून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 7:30 PM

‘हिरो’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली होती.

सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री स्टारर घातक या चित्रपटाच्या रिलीजला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट ८ नोव्हेंबर १९९६ रोजी प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने जवळपास 204 कोटींची कमाई केली होती.या चित्रपटात अमरीश पुरी आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. पण ‘घातक’ या चित्रपटानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला.मीनाक्षीने एका बँकरसोबत लग्न केले असून, आता ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. लग्नानंतर ती अमेरिकेतच स्थायिक झाली.

अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असलेला सनी देओल पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय झाला आहे. मात्र या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी मीनाक्षी शेषाद्री गेल्या 25 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.मीनाक्षीने आपल्या करिअरमध्ये मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, ऋषी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. ​आता मीनाक्षी शेषाद्री ओळखणेही अवघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या लूकमध्ये खूप बदल पाहायला मिळत आहे. 

‘हिरो’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर  ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली होती. ५७ वर्षीय मीनाक्षीच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या स्पष्ट दिसत आहेत. आता तिला ओळखणेही अवघड आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असते.

विशेष म्हणजे मीनाक्षी अमेरिकेत टेक्सास शहरात राहते. तिथेच ती डान्स क्लासेस चालवते. वेळोवेळी ती तिच्या संपूर्ण टीमसोबत कार्यक्रमांमध्ये भाग घेते. तिने अनेक मोठ्या इव्हेंटमध्ये तिच्या टीमसोबत डान्स परफॉर्मही केले आहेत.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्रीसनी देओल