Join us  

'मिस्टर इंडिया' सिनमातली चिमुरडी आता आहे दोन मुलांची आई, अभिनय सोडून जाहिरात कंपनीत करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 6:00 AM

एका जाहिरात कंपनीत ती काम करते. हुजानने उच्च शिक्षणाची पदवी घेतल्यानंतर लगेच लग्न केले. इनस्टाग्रामवर हुजानचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण जात आहे.

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा १९८७ सालचा मिस्टर इंडिया सिनेमा सुपरहिट ठरला होता. सिनेमातील सर्वत्र व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या, यांत छोटीशी पण लक्षवेधी ठरली ती ‘टीना’ ही चिमुरडी. टीनाचे खरे नाव हुजान खोदैजी असे आहे. विशेष म्हणजे सिनेमाच्या शूटिंगवेळी टीना फक्त ६ वर्षाची होती. तिचा निरागस चेहरा, तिचे डोळे जितके बोलके तितकीच जादू तिच्या अभिनयातही होती. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी टीना अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली. इतक्या वर्षानंतरही मिस्टर इंडिया सिनेमा आठवला तर टीनाचीही आठवण झाल्याशिवाय राहात नाही. टीना म्हणजेच हुजान आता ३९ वर्षांची आहे. दोन मुलांची आई असलेली हुजान संसारात रमली आहे. एका जाहिरात कंपनीत ती काम करते. हुजानने उच्च शिक्षणाची पदवी घेतल्यानंतर लगेच लग्न केले. इनस्टाग्रामवर हुजानचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण जात आहे. 

या विषयी दिलेल्या एका मुलाखतीत हुजानने सांगितले होते की, “लोक मला अजूनही या मिस्टर इंडिया सिनेमाच्या बालकलाकार टीनाच्या भूमिकेमुळे ओळखतात. मला आनंद होतो. शूटिंग दरम्यान मला डायलॉग दिले गेले होते ते बघून मला अचनाक रडू कोसळले. आणि माझे तेच रडण्याचे सीन नंतर खरोखर सिनेमात वापरण्यात आले होते. 

पडद्यावर दिसणारी टीना अभिनय नाही तर खरोखर रडत असल्याचे सीन दाखवण्यात आले होते.जेव्हा टीना व्यक्तीरेखेचा मृत्यू होतो हा सीन शूट करताना खरोखर अनेकांना अश्रू अनावर झाले होते. इतकेच काय तर श्रीदेवी देखील स्वतःला रोखू शकल्या नव्हत्या. आणि जेव्हा पडद्यावर हा सीन रसिक पाहताच आजही अश्रु तरळतात कदाचित हीच टीनाच्या अभिनयातील जादू होती. सोशल मीडियावर ती सक्रीय असून तिचे विविध अंदाजातील हुजानचे फोटो पाहायला मिळतात. हुजान  बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसते. 

टॅग्स :अनिल कपूरश्रीदेवी