Join us  

सडकच्या सीक्वलची रिलीज डेट जाहीर, आलिया भट्ट दिसू शकते महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 4:57 PM

गेल्या अनेक दिवसांपासून पूजा भट्ट आणि संजय दत्त स्टारर 'सडक'च्या सीक्वलची चर्चा आहे. आता मेकर्सनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे लवकरच सडकचा सीक्वल तयार करण्यात येणार आहेकाही महिन्यांपूर्वी आलिया भट्ट आपले काका महेश भट्ट यांच्या ऑफिसबाहेर दिसली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून पूजा भट्ट आणि संजय दत्त स्टारर 'सडक'च्या सीक्वलची चर्चा आहे. आता मेकर्सनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जे तर्क-वितर्क लावण्यात येत होते त्यांना पूर्णविराम लागला आहे. लवकरच सडकचा सीक्वल तयार करण्यात येणार आहे. मेकर्सनी 12 नोव्हेंबर 2019 अशी सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. ट्रेड समीक्षक तरूण आदर्शने ट्वीट केले आहे.  

 

हा सिनेमा महेश भट्टच्या बॅनर खाली तयार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा भट्टची बहीण आलिया भट्ट यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे तसेच संजय दत्तसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे मात्र याबाबत कोणतिही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.   

काही महिन्यांपूर्वी आलिया भट्ट  महेश भट्ट यांच्या ऑफिसबाहेर दिसली होती. आलियासोबत संजय दत्तसुद्धा स्पॉट झाला होता. यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. सध्या आलिया आपला आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात आलियासह रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा सिनेमा तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. करण जोहरचा धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

टॅग्स :संजय दत्तआलिया भट