Join us  

'सूर्यवंशम' सिनेमाशी रेखाचेही खास कनेक्शन,तुमच्याही लक्षात नसेल आली ही 'बिग' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 6:08 PM

अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने समीक्षकांची वाहवा मिळवली आणि आजही त्यांची ही दुहेरी भूमिका लोकांच्या लक्षात आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'सूर्यवंशम' चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्ष झाली आहेत. मात्र आजही या सिनेमाची जादू कायम आहे. सूर्यवंशम सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे फ्लॉप सिनेमांच्या यादीत गणला जात असला तरी अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधला हा सिनेमा सुपरहिट मानला जातो.

टीव्हीवर सतत सूर्यवंशम सिनेमा दाखवला जातो. त्यामुळे क्वचितच असा कोणी असेल ज्याने हा सिनेमा पाहिला नाहीय.टीव्हीवर सगळ्यात जास्तवेळा दाखवला जाणारा सिनेमा सूर्यवंशम आहे. अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अमिताभ मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसले होते. पण तुम्हाला माहिती आहे का ?  या सिनेमात रेखा यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

सिनेमात अमिताभ यांच्या पत्नीची भूमिका साकारणा-या दोन्ही अभिनेत्री सौंदर्या आणि जया सुधा यांच्या डायलॉगला रेखा यांनीच आपला आवाज दिला होता. अशारितीने इतर कलाकारांप्रमाणे सूर्यवंशम सिनेमासाठी रेखा यांची पडद्यासमोर नसली तरी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका निभावली होती.

 

सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले होते. सोनी मॅक्सवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवण्यात आल्यामुळे हा सूर्यवंशम रसिकांचा आवडता सिनेमा बनला आहे. हा सिनेमात सतत सोनी मॅक्सला दाखवण्यामागे एक खास कारण आहे. सेट मॅक्स म्हणजेच आताच्या सोनी मॅक्सने ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे अधिकार तब्बल शंभर वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळे या चॅनेलवर हा सिनेमा वारंवार दाखवला जातो.

कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवुडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे. तसेच या सिनेमातील दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. यातील अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने समीक्षकांची वाहवा मिळवली आणि आजही त्यांची ही दुहेरी भूमिका लोकांच्या लक्षात आहे. 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चन