बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची आज जयंती असून आजही त्या रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. त्यांनी १८ मे, २०१७ साली जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीदेखील हळहळली होती.
रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.
चित्रपटांशिवाय रिमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होती. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर रिमा लागू व विवेक लागू यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी आहे.