Join us

​दिल्लीकरांना दिला श्रद्धाने प्रदूषण कमी करण्याचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 18:59 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूर मागील काही दिवस राजधानी दिल्लीत ‘रॉक आॅन २’च्या प्रचारात व्यस्त होती. तिला दिल्ली टूर चांगलाच त्रासदायक ...

अभिनेत्री श्रद्धा कपूर मागील काही दिवस राजधानी दिल्लीत ‘रॉक आॅन २’च्या प्रचारात व्यस्त होती. तिला दिल्ली टूर चांगलाच त्रासदायक ठरला आहे. दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाबाबतही तिला चिंता वाटायला लागली आहे. तिला खोकला झाला असून, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याची गरज असल्याचा सल्ला तिने दिल्लीवासियांना दिला आहे. या शुक्रवारी फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, शशांक अरोरा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रॉक आॅन २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वच कलावंत दिल्ली दौºयावर होते. दोन दिवस त्यांचा राजधानीत मुक्काम होता. यावेळी दिल्लीच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या श्रद्धाने दिल्लीच्या चाहत्यांना विनंती केली. श्रद्धाने लोकांना प्रदूषण कसे कमी करता येईल याचा विचार करायला हवा असे सांगितले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना श्रद्धा म्हणाली, ‘रॉक आॅन २’ च्या प्रमोशनसाठी मी दोन दिवसांपासून दिल्लीत होते, मुंबईला परत येताना माझ्यासोबत खोकला आहे. दिल्लीच्या प्रदूषणामुळे मला खोकला झाला आहे’. श्रद्धाने पुढे लिहले, ‘प्रदूषणामुळे दिल्लीत धुके पसरले आहे, तिथे श्वास घेणे कठीण ठरू लागले होते, आपण आपला काही वेळ पर्यावरणासाठी द्यायला हवा’. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील धुके मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेतील धुलीकण प्रमाणाबाहेर गेल्याने शाळा, महाविद्यालये व लहान कारखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता श्रद्धाने तिच्या चाहत्यांना विनंती करून प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिलाय. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे हे तेवढेच खरे. }}}}