Join us

तर या कारणामुळे अक्षय कुमारने सोडला गुलशन कुमाराचा बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 15:26 IST

अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून गुलशन कुमार यांच्या बायोपिकला घेऊन चर्चेत आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांचा बायोपिक 'मोगुल'मधून वेगळा झाला आहे.

ठळक मुद्देगुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेतया सिनेमाची चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे

अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून गुलशन कुमार यांच्या बायोपिकला घेऊन चर्चेत आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांचा बायोपिक 'मोगुल'मधून वेगळा झाला आहे.  अक्षय कुमार यात गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार होता.  

अक्षयने सांगितले की, सिनेमाच्या स्क्रिप्टला घेऊन तो संतुष्ट नव्हता. याकारणामुळे त्यांने सिनेमा करण्यास नकार दिल्याचे सांगितले. सूत्रांचे मानाल तर यामागे  ग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमारची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय व गुलशन कुमार यांच्यात बऱ्याच अंशी साम्य आहे. अक्षय आणि आम्ही पंजाबी आहोत. तो दिल्लीचा आहे. माझे वडीलही दिल्लीचे होते, असे ती म्हणाली होती. त्यानंतर सलमानचे नाव समोर आले होते. पण, त्याचीही वर्णी लागली नाही. काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी रणवीर सिंगला अप्रोच करण्यात आले होते. भूषण कुमारच्या म्हणण्यानुसार अजून सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे.  गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असणार असल्याचे बोलले जाते. आमीर खान बायोपिकची निर्मिती करणार असल्याचे समजल्यापासून तोच गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाची चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे. 

अक्षय कुमार सध्या तिचा आगामी सिनेमा गोल्डच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मौनी रॉय, अमित साध, विनीत कुमार सिंग आणि कुणाल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.  

टॅग्स :अक्षय कुमार