Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंह राजपूतने या प्रसिद्ध अभिनेत्रीसह कधीच काम न करण्याची घेतली होती शपथ, कोण आहे ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:43 IST

म्हणून पुन्हा कधीच सारासह काम करणार नसल्याचाच निर्धार सुशांतने केला होता.  सुशांतच्या निर्णयामागे अमृता सिंह जबाबदार असल्याचे बोलले गेले.

सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. सुशांत सिंह राजपूतसह तिने बॉलिवूडमधील पहिला डेब्यू केला होता. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा कधीच सारासह काम करणार नसल्याचाच निर्धार सुशांतने केला होता.  सुशांतच्या निर्णयामागे अमृता सिंह जबाबदार असल्याचे बोलले गेले.

'केदारनाथ' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान यांचे अफेयर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यानंतर अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली होती . या दोघांच्या नात्यांवर अशाप्रकारे संशय घेणे सुशांतला चांगलेच खटकले होते. त्यामुळे सुशांत आणि सारा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.  

 

दोघांमध्ये मैत्रीचे देखील बंध उरले नव्हते. सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.