Join us

​या कारणामुळे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी दिला नच बलियेसाठी नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:27 IST

नच बलिये या कार्यक्रमात नेहमीच छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार आपल्या जोडीदारासोबत नृत्य सादर करताना पाहायला मिळतात. या कार्यक्रमात अनेक ...

नच बलिये या कार्यक्रमात नेहमीच छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार आपल्या जोडीदारासोबत नृत्य सादर करताना पाहायला मिळतात. या कार्यक्रमात अनेक क्रिकेटर्सनेदेखील आपल्या जोडीदारसोबत हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत सात सिझन झाले असून सगळेच सिझन हिट गेले आहेत. अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांनी या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनचे विजेतेपद मिळवले होते. या कार्यक्रमाच्या सगळ्याच सिझनमध्ये अनेक दिग्गज आपल्याला परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळाले आहेत. यंदाच्या सिझनसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांना विचारण्यात आले होते. पण त्यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कपल मानले जाते. ते काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकले होते. त्यावेळी त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. आता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय आणि ट्विंकल हे नच बलिये या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांना विचारण्यातदेखील आले होते. पण त्या दोघांनीही यासाठी नकार दिला आहे. अक्षय आणि ट्विंकल हे दोघेही त्यांच्या कामात व्यग्र असल्याने या कार्यक्रमासाठी द्यायला त्यांच्याकडे तारखाच शिल्लक नसल्याने त्यांनी या कार्यक्रमाची ऑफर स्वीकारली नसल्याचे म्हटले जात आहे. अक्षय आणि ट्विंकलने नकार दिल्यानंतर सध्या परिणिती चोप्रा, शामक दावर यांसारख्या सेलिब्रेटींचा परीक्षक म्हणून विचार केला जात आहे.