कतरिना कैफ ही रणबीर कपूरचा भूतकाळ आहे तर आलिया भट हा वर्तमान. प्ले बॉय म्हणून ओळखल्या जाणा-या रणबीर कपूरचे नाव अनेकींशी जोडले गेले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची. ऐकून आश्चर्य वाटेल पण रणबीर व कॅट दोघेही सहा वर्षे नात्यात होते. मग असे काय झाले की, या नात्याचा ‘दी एंड’ झाला. आज आम्ही तुम्हाला यामागचे नेमके कारण सांगणार आहोत.
2009 साली ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या सिनेमाच्या सेटवर रणबीर व कतरिनाची प्रेम कहाणी सुरू झाली होती. अर्थात सुरुवातीला फक्त मैत्री होती. पण ही मैत्री प्रेमात कधी बदलली, हे दोघांनाही कळले नाही. ‘राजनीती’च्या सेटवर ही प्रेमकहाणी चांगलीच बहरली. कारण याच सिनेमानंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. पुढे दोघांच्या व्हॅकेशनचे बोल्ड फोटो व्हायरल झालेत आणि या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. इतकेच नाही तर यानंतर काहीच दिवसांत हे जोडप लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्याही बातम्या आल्यात. मग बिनसले कुठे?
असे म्हणतात की, रणबीर व कतरिना एकमेकांप्रती खूप गंभीर होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण एका व्यक्तिचा या नात्याला प्रचंड विरोध होता. याच विरोधामुळे कॅट व रणबीरचे ब्रेकअप झाले. ही व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती व्यक्ती होती रणबीर कपूरची आई नीतू सिंग. नीतू यांना कतरिना जराही पसंत नव्हती. याचमुळे दोघांचे ब्रेकअप झाले.या ब्रेकअपनंतर कतरिना सैरभैर झाली होती. एका मुलाखतीत ती यावर बोलली होती.