Join us  

‘हिरो व त्यांच्या गर्लफ्रेन्डने मला चित्रपटातून काढले’, सुशांतच्या मृत्यूनंतर रवीना टंडनने काढली भडास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:34 PM

रवीना म्हणते, बॉलिवूडमध्ये घाणेरडे राजकारण

ठळक मुद्देकंगना राणौत, शेखर कपूर यांच्यासह अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे. 

एकीकडे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने अख्ख्या देशाला हादरवून सोडले असताना दुसरीकडे बॉलिवूडमध्ये मात्र घमासान सुरु आहे. सुशांतने आत्महत्या केली पण जाताना तो अनेक प्रश्न मागे सोडून गेला. सोशल मीडियावर अनेक जण त्याच्या मृत्यूला नेपोटिजम जबाबदार असल्याचे मानत आहेत.  कंगना राणौत, शेखर कपूर यांच्यासह अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे. आता अभिनेत्री रवीना टंडन हिनेही आपली भडास काढली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत घाणेरडे राजकारण असल्याचा आरोप तिने केला आहे.

रवीनाने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करत आपली भडास काढली. तिने लिहिले, ‘बॉलिवूडमध्ये मीन गर्ल गँग... तुमची खिल्ली उडवली जाते. हिरो त्यांच्या गर्लफ्रेन्ड्सला संधी देण्यासाठी तुम्हाला चित्रपटातून काढून टाकतात़. चमचे पत्रकार आणि त्यांच्या फेक मीडिया स्टोरिजमुळे तुमचे करिअर संपवले जाते. इथे टिकायचे असेल तर अपार संघर्ष करावा लागतो. फाईट बॅक करावे लागते. काही तगतात, काही नाही,’ असे पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिलेय.

तेव्हा तुम्हाला वेडे ठरवले जाते़...

खरे बोलता तेव्हा तुम्हाला वेडे, सायकॉटिक ठरवले जाते. चमचे पत्रकार भरभरून तुम्हाला तसे सिद्ध करतात आणि तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरतात, असे रवीनाने दुस-या ट्विटमध्ये लिहिले आहे.

घाणेरडे राजकारण

मला इंडस्ट्रीने खूप काही दिले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण येथील घाणेरड्या राजकारणामुळे अनेकदा मन खट्टू होते. इंडस्ट्रीत काम करणा-या कुणासोबतही हे घडू शकते. इनसाइडर जशी की मी किंवा आऊटसाइडर. काही अँकर्स इनसाइडर, आऊटसाइडर म्हणून ओरडत आहेत.  त्यांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला. पण मी तितक्याच वेगाने पलटवार केला, असे एका ट्विटमध्ये तिने लिहिले.

प्रचंड दबावइंडस्ट्रीवर माझे प्रेम आहे. पण इथे प्रचंड दबाब आहे. येथे चांगले लोक आहेत. पण घाणेरडी काम करणारेही असंख्य आहेत. प्रत्येक प्रकारचे लोक तुम्हाला इथे भेटतील. जग असेच असते, असे एका ट्विटमध्ये तिने लिहिले आहे. 

टॅग्स :रवीना टंडनसुशांत सिंग रजपूत