नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. तिच्या प्रत्येक नवनवीन फोटो, व्हिडीओची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. परंतु, सेलिब्रिटींचं कौतुक करणारे हेच नेटकरी कलाकारांना ट्रोलही करत असतात. सध्या रश्मिकाला असंच नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ओव्हर अॅक्टिंगची दुकान असं म्हणत चिडवायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना घाईघाईत तिच्या कारमध्ये बसते. मात्र, कारमध्ये बसल्यानंतर ती लहान मुलांसारखं खिडकीच्या वर काही तरी शोधण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने केलेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
सुरुवातीला रश्मिका डास मारतीये असं साऱ्यांना वाटलं. परंतु, ती साइड स्वीच प्रेस करत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे तिला ट्रोल केलं आहे. 'प्लीज अॅक्टिंक कर पण, ओव्हर अॅक्टिंग अजिबात करु नको', असं एकाने म्हटलं आहे. तर, 'नॅशनल ओव्हर अॅक्टिंग',असं एक युजर म्हणाला. तर, 'ही तर ओव्हर अॅक्टिंगच्या पण वरची ओव्हर अॅक्टिंग करतीये', असं अन्य नेटकऱ्याने म्हटलं.
दरम्यान, रश्मिका दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट 'किरिक' पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली.