Join us
Daily Top 2Weekly Top 5

GoodByeच्या सेटवर सेलिब्रेट झाला नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा बर्थ डे, पार्टीत बिग बी पण दिसले मास्क लावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 16:43 IST

रश्मिका मंदानाने नुकताच आपला 25वा वाढदिवस साजरा केला.

'नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘गुडबाय'चे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे आणि त्याच चित्रपटाच्या सेटवर रश्मिका बर्थडे साजरा करण्यात आला. रश्मिका मंदानाने नुकताच आपला 25 वा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी चित्रपट दिग्दर्शक विकास बहल आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोज देताना ती दिसली. कोरोनाच्या वाढत्या धोका लक्षात घेते बिग बींनी फोटोमध्ये तोडांवर मास्क लावले दिसतोय. 

रश्मिकाच्या वाढदिवशी, चित्रपटाच्या टीमने सेटवरच साजरा केला कारण त्यादिवशी ती शूटिंगमध्ये बिझी होती. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात घेत सेटवरचं छोटेसे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी कोरोनाशी संबंधित सर्व नियमांची काळजी घेतली गेली.  केक कापतानाही सर्वांनी मास्क घातले होते. 

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त शॉट मुंबईत शूट करण्यात आला आहे.  रश्मिकाने पहिल्याच दिवसापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. विकास बहल आणि एकता कपूर पुन्हा एकदा ‘गुडबाय’ सिनेमात सोबत एकत्र येत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय रश्मिका 'मिशन मजनू' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे.  या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील दिसणार आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानाअमिताभ बच्चन