Join us  

Badshah : प्रसिद्ध रॅपर बादशाह ‘या’ अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ, दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 3:07 PM

Rapper And Singer Badshah : रॅपर आणि गायक बादशाह पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. पत्नीपासून विभक्त झालेल्या बादशाहच्या आयुष्यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.

प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाह  (  Rapper And Singer Badshah ) पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बादशाहचं नाव पंजाबी अभिनेत्री व मॉडेल ईशा रिखीसोबत जोडलं जातंय. गेल्या वर्षभरापासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. आता या कपलबद्दल एक नवं अपडेट समोर आलंय. होय, हे कपल लवकरच लग्न करणार आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, बादशाह व ईशा आपल्या नात्याला अधिकृत नाव देण्याच्या तयारीत आहेत. लग्नाचा खूप गांभीर्याने विचार करत आहे आणि लवकरच याबद्दल एक मोठी घोषणा करणार आहे. जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात हे दोघं लग्न करणार आहेत.

बादशाहा-ईशा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या गेल्या वर्षी सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या होत्या. रिपोर्टनुसार, एका पार्टीत दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. आता दोघंही लग्न करणार आहेत. अर्थात अद्याप बादशाहने अधिकृतरित्या याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. बादशाहने लग्न केलंच तर हे त्याचं दुसरं लग्न असेल. त्याचं पहिलं लग्न जस्मिन मसिहशी झालं होतं, जॅस्मिनकडून त्याला एक मुलगीदेखील आहे.  २०२० मध्ये हे दोघांचा घटस्फोट झाला होता.  

ईशा एक पंजाबी अभिनेत्री आहे. तिनं 2013 मध्ये Jatt Boys Putt Jattan De या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.. या सिनेमात ती सिप्पी गिलसोबत दिसली होती. तिने अनेक पंजाबी सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. नवाबजादे या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र तिला बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळाली नाही. ईशाचा शेवटची 2019 मध्ये आलेल्या Mindo Taseeldarni चित्रपटात दिसली होती. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे.  

टॅग्स :बादशहाबॉलिवूड