Join us

रणवीरला व्हायचेय संसारी पुरूष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:46 IST

शीर्षक वाचून गोंधळून जाऊ नका.. ही काही अफवा नसून सत्य आहे. रणवीर सिंगला म्हणे, थाटामाटात लग्न करून संसार करायचाय. ...

शीर्षक वाचून गोंधळून जाऊ नका.. ही काही अफवा नसून सत्य आहे. रणवीर सिंगला म्हणे, थाटामाटात लग्न करून संसार करायचाय. ‘बेफिक्रे’ फेम रणवीरला अचानक हे काय झाले? असे तुम्हाला वाटत असेल. पण, हे अगदी खरंय. रणवीर सिंग हा त्याच्या करिअरच्या अत्युच्च टोकावर असला तरीही लग्न करून सर्वसामान्यांप्रमाणे संसार थाटण्याचा विचार त्याच्या मनात डोकावलाय.  पण, हा काळ त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा असल्याने त्याने हा विचार सध्या तरी बाजूला सारून ठेवला आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे नाते काही ‘बी टाऊन’ पासून लपून राहिलेले नाहीये. कधी पार्टीज, तर कधी आऊटिंग करत ते अनेकदा एकत्र दिसतात. नुकतेच ते ‘अंबानी बॅश’ साठी सोबत आले होते. मग काय ? त्यांना पाहून फोटोग्राफर्सनी त्यांचे एकत्र अनेक फोटो क्लिक केले. ‘पद्मावती’ ची शूटिंग सुरू झाल्यापासून या दोघांना निमित्तही लागत नाही. त्यांची सेटवर दररोजच भेट होते. दररोजच्या भेटण्याने रणवीरच्या मनात लग्न करून संसार थाटण्याचा विचार डोकावला असेल, अशी दाट शक्यता आहे.