Join us  

'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 3:51 PM

रणवीर सिंग पुन्हा एकदा आलिया भटसोबत काम करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने गेल्या काही वर्षभरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. त्याच्याकडे सध्या काही प्रोजेक्ट आधीपासून आहेत आणि आता त्याच्या आणकी एका प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंग पुन्हा एकदा आलिया भटसोबत काम करताना दिसणार आहे. यावेळी त्या दोघांना एकत्र आणण्याचे काम करण जोहरने केले आहे. सध्या चित्रपटाबद्दल जास्त माहिती मिळू शकलेली नाही. पण, या चित्रपटाच्या शूटिंगला २०२१मध्ये सुरूवात केली जाणार आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्ट्सनुसार रणवीर आपल्या सर्व प्रोजेक्ट्सचे काम संपवून या चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार आहे. शूटिंगच्या आधी २५ दिवसांचा एक वर्कशॉप अटेंड करणार आहे. आलिया भटदेखील यात सहभागी होणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला एप्रिल, २०२१मध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सर्व शूटिंग संपवल्यानंतर काही काळ ब्रेक घेणार आहे. त्यानंतर या वर्कशॉपवर काम करणार आहे. तर आलिया भट संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडचे शूटिंग पूर्ण करून या चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांना पुढील वर्षी आलिया भट व रणवीर सिंग ही जोडी रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. गली बॉयमध्ये या दोघांचे काम प्रेक्षकांना खूप भावले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा काय कमाल दाखवते हे पाहणे कमालीचे ठरेल.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर सिंगचा ८३ हा चित्रपट २०२१मध्ये रिलीज होणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीचा चित्रपट सूर्यवंशीमध्येही दिसणार आहे.

याशिवाय जाएसभाई जोरदारमध्येही काम करतो आहे. तर आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती गंगूबाई काठियावाडशिवाय ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंगआलिया भट