Join us  

असे शूट होतात रोहित शेट्टीच्या सिनेमातील कार स्टंट, रणवीर सिंगने केली ‘पोलखोल’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 2:06 PM

‘सर्कस’च्या सेटवरचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

ठळक मुद्दे‘सर्कस’ या नावावरून एक अंदाज तुम्हाला आला असेलच की, हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस व वरूण शर्मा दिसणार आहेत.

रोहित शेट्टी बॉलिवूडचा टॉपमोस्ट डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. रोहित शेट्टीचा सिनेमा म्हटल्यावर, जबरदस्त कार स्टंट आलेच. किंबहुना कार स्टंट नसतील तर त्याला रोहित शेट्टीचा सिनेमा म्हणताच येणार नाही. महागड्या अलिशान गाड्या हवेत उडतात, एकमेकांवर आदळतात असे सीन्स रोहितच्या सिनेमात दिसणार म्हणजे दिसणारच. पण हे कार स्टंट कसे शूट होतात हे तुम्हाला माहितीये? माहित नसेल तर रणवीर सिंगने शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. होय, रणवीरने हा व्हिडीओ शेअर करून रोहित शेट्टीच्या कार स्टंटमधील हवाच काढून घेतलीये, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

रणवीर सध्या रोहितच्या ‘सर्कस’ या सिनेमाचे शूटींग करतोय. या सिनेमाच्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत रोहित शेट्टी एक क्लोन कार चालवताना दिसतोय आणि रणवीर त्याचा व्हिडीओ शूट करतोय. इस देश का सबसे ज्यादा सीरिअस स्टंट डायरेक्टर, असे रणवीर म्हणतो. यावर, ‘अबे तू शूट कर रहा है,’ असे रोहित म्हणतो.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रोहित शेट्टीच्या सिनेमातले कार स्टंट सीन्स कसे शूट होतात, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेन.  होय, स्क्रीनवर जी कार हवेत उडते, ती खरीखरी नसतेच मुळी. त्या सर्व क्लोन कार असतात.  क्लोन कारचे व्हिज्युअल एफेक्ट असतात. व्हिडीओत अशीच एक क्लोन कार रोहित शेट्टी चालवतोय आणि त्याची खरीखुरी प्रतिकृती असलेली ओरिजनल कार बाजूला उभी आहे.

‘सर्कस’ या नावावरून एक अंदाज तुम्हाला आला असेलच की, हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस व वरूण शर्मा दिसणार आहेत. कॉपीराईटच्या भीतीने रोहितने या सिनेमाचे नाव बदलले असे मध्यंतरी चर्चा होती. त्याआधी   रणवीर सिंग व रोहित शेट्टी मिळून ‘अंगूर’ नामक सिनेमा बनवणार असल्याची चर्चा होती. हा सिनेमा संजीव कुमारच्या ‘अंगूर’ या सिनेमाचा रिमेक असल्याचा दावाही केला गेला होता. रणवीर यात डबलरोलमध्ये दिसणार, अशीही चर्चा होती. आता मात्र या सिनेमाचे नाव ‘अंगूर’ नाही तर ‘सर्कस’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित शेट्टीने कॉपीराईटच्या वादाला घाबरून ऐनवेळी सिनेमाचे नाव बदलल्याचे मानले जात आहे. 

टॅग्स :रोहित शेट्टीरणवीर सिंग