Join us  

इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:39 AM

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. पण फॅशनचे म्हणाल तर याबाबतीत त्याच्या इतका दुसरा कोणताही अभिनेता ट्रोल होत नाही.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीरचा ‘83’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमात बिझी आहे.

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. प्रत्येक सिनेमात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण फॅशनचे म्हणाल तर याबाबतीत त्याच्या इतका दुसरा कोणताही अभिनेता ट्रोल होत नाही. आत्ताही आपल्या अशाच विचित्र फॅशन सेन्समुळे रणवीर ट्रोल होतोय.

रणवीरने  ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. foamrunnin’ the game कॅप्शनसह शेअर केलेल्या या फोटोत रणवीर कॅज्युअल लूकमध्ये आहे. पण त्याचा लुक नेहमीप्रमाणे विचित्र आहे. त्याच्या या फोटोंवर फॅन्स वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत. अगदी ‘इलाज करवा लो यार...,’ असे एका युजरने म्हटले आहे. तू भारतात कुठे जन्मलास, तुझ्यासाठी ब्राझिल योग्य आहे, असे एका युजरने लिहिले.

रणवीर अनेकदा अशा अतरंगी अवतारात दिसतो. यावरून अनेकदा तो ट्रोलही होतो. पण रणवीरने कधीच याची पर्वा केली नाही. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो.

कधी विविध रंगाच्या टोप्या, हटके गॉगल्स, शूज, रंगीबेरंगी कपडे अशा सगळ्या अवतारामुळे रणवीर सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो.रणवीरचे आउटफिट्स नेहमीच वेगळे असतात. परंतु, अनेकदा त्याला आपल्या कपड्यांच्या फॅशनमुळे ट्रोल व्हावे लागले आहे. ब-याचदा रणवीर सिंगच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर त्याची खिल्लीही उडवली जाते. मस्तमौला रणवीर त्याला आवडेल तेच करतो. रणवीर कुठलीही स्टाईल कॅरी करायला मागे पुढे पाहत नाही.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीरचा ‘83’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमात बिझी आहे.

टॅग्स :रणवीर सिंग