Join us  

Ranveer Singh: रणवीर सिंग अर्जुन कपूरसोबत करणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 7:29 PM

Ranveer Singh And Arjun Kapoor: रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर ६७ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ चे सूत्रसंचालन करणार आहेत.

अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची मैत्री कोणापासून लपलेली नाही. जेव्हा-जेव्हा हे दोघे एकत्र येतात, तेव्हा एकच खळबळ माजवतात आणि असेच काहीसे पाहायला मिळणार आहे, यावेळी फिल्मफेअर या प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर. खरं तर, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर या वर्षी ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित ६७ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ चे सूत्रसंचालन करणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करण्यासाठी खुद्द रणवीर सिंग देखील खूप उत्सुक आहे.

गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत रणवीर सिंगने सांगितले की तो अर्जुनसोबत फिल्मफेअर होस्ट करण्यास उत्सुक आहे. इतकेच नाही तर रणवीरने या अवॉर्ड फंक्शनशी संबंधित त्याच्या काही आठवणीही येथे शेअर केल्या. रणवीरने सांगितले की, या पुरस्कार सोहळ्यात जेव्हा त्याने सहकलाकार अनुष्का शर्मासोबत त्याच्या डेब्यू फिल्म 'बँड बाजा बारात' मधील गाण्यांवर पहिला परफॉर्मन्स दिला तेव्हा अनेक अभिनेते आणि विशेषतः अमिताभ बच्चन यांना पहिल्या रांगेत पाहून खूप घाबरला होता. 

त्याचवेळी, गली बॉय या चित्रपटासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ट्रॉफी घेणे ही तिच्या सर्वात सुंदर आठवणींपैकी एक आहे. 
टॅग्स :रणवीर सिंगअर्जुन कपूर