रणवीर सिंगने कॅटरिना कैफचे केले इन्स्टाग्रामवर वेलकम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 13:11 IST
अभिनेता रणवीर सिंगचा लुक तुम्ही पाहिलाय का? ‘पद्मावती’ चित्रपटासाठी त्याने त्याचा हा लुक बदलला आहे. सध्या तो बऱ्याच ठिकाणी ...
रणवीर सिंगने कॅटरिना कैफचे केले इन्स्टाग्रामवर वेलकम!
अभिनेता रणवीर सिंगचा लुक तुम्ही पाहिलाय का? ‘पद्मावती’ चित्रपटासाठी त्याने त्याचा हा लुक बदलला आहे. सध्या तो बऱ्याच ठिकाणी अशाच लुकमध्ये दिसून येतो आहे. त्याने कॅटरिना कैफ हिला इन्स्टाग्रामवर अकाऊंट ओपन केल्याबददल स्वागत केले आहे. केवळ वेलकम करून तो थांबला नाही तर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्याला त्याने ‘देर आये दुरूस्त आये ! कॅटरिना कैफ तुझे इन्स्टाग्रामच्या या मोठ्या जगात स्वागत करतो.’ कॅटने इन्स्टाग्राम जॉईन करताच तिचा जवळचा मित्र अभिनेता अक्षय कुमार यानेही तिचे वेलकम केले होते. तसेच सलमान खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहर यांनी तिचे स्वागत केले होते. रणवीर सिंग हा सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाची शूटिंग करतो आहे. दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर हे त्याच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहेत.