Join us

रणवीर सिंग पॅरिसला रवाना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 21:12 IST

अभिनेता रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ विषयी फारच उत्सुक आहे. आदित्य चोप्रा चित्रपटाचा दिग्दर्शक असून चित्रपटाचे शूटिंग ...

अभिनेता रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ विषयी फारच उत्सुक आहे. आदित्य चोप्रा चित्रपटाचा दिग्दर्शक असून चित्रपटाचे शूटिंग हे पॅरिस येथे होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर रणवीर हा यशराज फिल्मसकडे वळला आहे. त्याने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘पॅरिस बाऊंड...बेफिक्रे ,’ चित्रपटात त्याची एकदम चॉकलेट बॉय प्रमाणे भूमिका आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर देखील असणार आहे. यशराज फिल्मसच्या ‘बँड बाजा बारात’ या होम प्रोडक्शन कंपनीत त्याला लाँच करण्यात आले होते. आदित्य चोप्राचे वडील यश चोप्रा यांच्या ८३व्या जयंतीनिमीत्त त्यांना ‘बेफिक्रे’ समर्पित करणार आहे. आदित्य चोप्राही जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कमबॅक करत आहे. चित्रपट ९ डिसेंबर २०१६ रोजी रिलीज होणार आहे.